कोरोनाच्या काळात सुद्धा जिल्हा नियोजन चा ९८ टक्के निधी खर्च…

2

पालकमंत्र्यांकडून कौतुक २२५ पैकी २२१ कोटी रुपयांचा निधी खर्च…

ओरोस ता.०१: जिल्हा नियोजन मंडळाच्या खर्च ९८ टक्के झाला आहे. २२५ कोटी रूपये निधीतील २२१ कोटी रूपये निधी खर्च झाला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व यंत्रणा कामाला लागलेली असताना झालेला खर्च पाहता जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
२०१९-२० साठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनला २२५ कोटी निधी प्राप्त झाला होता. यातील ५२ टक्के निधी खर्च फेब्रुवारी अखेर झाला होता. तर मार्च महिन्यात कोरोना साथरोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे निधी खर्च १०० टक्के होणार की नाही ? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोरोना दहशतीवर मात करीत ९८ टक्के निधी खर्च करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

दरम्यान श्री सामंत पुढे म्हणाले
जिल्ह्यात आतापर्यंत एकच कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याचा दूसरा नमूना पुणे येथे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल गुरुवारी येणार आहे. तसेच बुधवारी नव्याने चार नमूने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच आयसोलेशनमध्ये आठ रुग्ण वाढले असून सध्या 20 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री सामंत यांनी नियोजन मंडळाच्या जुन्या सभागृहात दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आ वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते आदी उपस्थित होते.

1

4