उद्योजक केदार झाड याचा गरजूंना मदतीचा हात…

2

वायरीतील ५० जणांना घरपोच धान्य वाटप…

मालवण, ता. १ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केल्यामुळे सर्वांचेच काम धंदे बंद राहिले आहेत. परिणामी गरीब व रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून वायरी भूतनाथ येथील किनारा रिसॉर्टचे केदार झाड यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
वायरी मधील ५० गरजू कुटुंबाना प्रत्येकी ५ किलो तांदूळ आणि १ किलो तूरडाळ प्रत्येकाच्या घरी जाऊन देण्यात आली. यासाठी जय भुतनाथ युवा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. यावेळी लाभार्थ्यांनी दानशूरांचे आभार मानले. या धान्य वाटपास उद्योजक केदार झाड, ग्रामपंचायत सदस्य मुन्ना झाड, नाना नाईक आणि जय भुतनाथ युवा प्रतिष्ठानचे गोट्या मसुरकर, विकी लोकेगावकर, जीवन मसुरकर, संकेत वस्त, मंदार बोडवे, संदेश झाड, ओंकार देऊलकर, सौरभ झाड, यश रावले, दीपक ढोलम, भूषण रावले, अक्षय देऊलकर, विकी मसुरकर, योगेश मसुरकर, तेजस देऊलकर, ओंकार लुडबे यांनी लाभार्थ्यांना घरपोच धान्य पोचविण्यास मेहनत घेतली.

4

4