वेंगुर्लेत विनाकारण फिरणाऱ्या ६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल…

2

वेंगुर्ला ता.०१: विनाकारण फिरणाऱ्या व आदेशाचे भंग करणाऱ्या वेंगुर्ल्यातील सहा वाहन धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनाकारण फिरणाऱ्या जास्तीत-जास्त वाहन धारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी दिली.

कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विनाकारण फिरणाऱ्या व आदेशाचे भंग करणाऱ्या वाहन धारकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार सिधुदुर्ग पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारवाईचे धोरण राबविले आहे.आत्तापर्यंत वेंगुर्ल्यातील ६ वाहनधारकांवर विनाकारण फिरुन आदेशाचे भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची कारवाई वेंगुर्ला पोलिस निरीक्षक तानाजी मोरे व त्यांच्या पोलिस पथकाने केली.नागरीकांनी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून घरी राहण्याचे आवाहन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

2

4