धीर धरा…,लष्कराला बोलावण्याची वेळ येवू देवू नका…!

2

शरद पवारांचे आवाहन; आरोग्य सेवा देणार्‍या डॉक्टरांचे कौतूक…

मुंबई.ता,०२:  
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दोन आठवडे धीर धरा,गर्दी करणे टाळा लष्कराला बोलावण्याची वेळ येवू देवू नका असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज येथे केले त्यांनी आजाराच्या पार्श्वभूमिवर फेसबूकच्या माध्यमातून राज्यातील नागरीकांशी संवाद साधला
यावेळी त्यांनी आरोग्य सेवा देणार्‍या डॉक्टरचे कौतुक केले तसेच त्यांनी चांगली सेवा द्यावी मात्र सेवा देत असताना आपल्यासह आपल्या कुंटूबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले तसेच मुस्लीम बांधवानी काही दिवस घरातच नमाज अदा करावी तसेच त्यांनी आपल्या मृत स्वकीयांच्या प्राथनेसाठी कब्रस्तान मध्ये जाणे टाळावे असे आवाहन केले

3

4