Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedकिल्ले सिंधुदुर्गसह तालुक्यात रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा...

किल्ले सिंधुदुर्गसह तालुक्यात रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा…

शासनाच्या आवाहनाला देवस्थान मंडळांचा प्रतिसाद…

मालवण, ता. २ : किल्ले सिंधुदुर्गसह तालुक्यात आज रामनवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यात रामनवमी उत्सव साजरा झाला. महाप्रसाद तसेच अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू असल्याने तहसीलदार अजय पाटणे यांनी तालुक्यात रामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. पुजाऱ्यांनीच पूजा तसेच अन्य धार्मिक विधी करावेत. यात गर्दी होऊ नये यासाठी महाप्रसाद तसेच अन्य कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना सर्व देवस्थान मंडळांना केल्या होत्या.
किल्ले सिंधुदुर्ग येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका रामनवमी उत्सवाला बसल्याचे दिसून आले. किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात पुजारी श्री. सकपाळ यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर रामजन्म सोहळा पार पडला. या उत्सवात सहभागी होणाऱ्या मच्छीमार बांधव तसेच अन्य भाविकांना किल्ल्यात न येण्याच्या सूचना किल्ला रहिवाश्यांनी केल्या होत्या. त्याला भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शहरातील भरड, मेढा, गवंडीवाडा तसेच अन्य भागात आणि तालुक्यातही साध्या पद्धतीने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments