मातोंड येथील परप्रांतीय मजुरांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

2

 

श्री सातेरी युवक कला- क्रीडा मंडळ, मातोंड” यांचा पुढाकार

वेंगुर्ले
मातोंड येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काम करणाऱ्या सुमारे ३५ ते ४० परप्रांतीय कामगारांच्या मदतीसाठी येथील श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळाने पुढाकार घेतला. या कामगारांना मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत तांदूळ, डाळ, गहू, तेल, कांदे, बटाटे व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून आता कडक पावले उचलण्यात आली आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र शासनाने संचारबंदी कायदा लागू केल्यानंतर हे काम बंद झाल्याने या रस्त्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. तसेच या रस्त्याच्या ठेकेदाराही आज येतो, उद्या येतो असे कामगारांना सांगून दुर्लक्ष करत असल्याचेही येथील कामगारांनी सांगितले. यामुळे या कामगारांच्या मदतीला आता येथील युवक मंडळाने पुढाकार घेतला असून त्यांना पुढील २ आठवडे पुरणारे धान्य दिले आहे. यावेळी मंडळाचे सल्लागार अभय परब, राजेंद्र सावंत, नारायण (बाळा) परब, सदस्य रविकिरण परब, जगदीश परब, माजी उपसरपंच सुभाष सावंत, राहुल प्रभू, महेश वडाचेपाटकर, सुधीर मातोंडकर, हर्षल परब, गायेश परब, सागर परब, गिरीश प्रभू, पत्रकार दीपेश परब, भगवान नर्से, बबलू पेडणेकर, काशी परब, प्रथमेश परब, मातोंड वरचे बांबर शाळेचे शिक्षक श्री साबळे आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा काटेकोरपणे पालन करण्यात आले.

4

4