जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा; सोशल मीडियावर पोलिसांचा बारीक लक्ष…
सिंधुदुर्गनगरी ता.०३: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे संदेश, फोटो अगर कोणतीही व्हिडिओ टाकल्यास किंवा टिक-टॉक, इंस्टाग्राम आधी सोशल मीडियावर भावना दुखावणारे पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप एडमिन वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे यात गेले काही दिवस सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट असल्याचे त्यांचे म्हणणे अशा पोस्टवर पोलीस दलाचे बारकाईने लक्ष असून कोणी आल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला