खासदार निधीतून लोकसभा मतदारसंघासाठी ५९ लाखाचे मास्क…

2

सावंतवाडी ता.०३:  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन्ही जिल्ह्यात मास्क वाटपासाठी एकूण ५९ लाख ६० हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.यात सिंधुदुर्गसाठी २७ लाख ६० हजार तर रत्नागिरीसाठी ३२ लाख रुपयांच्या मास्कचे वाटप होणार आहे.याबाबतची मागणी श्री.राऊत यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.

4

4