१४ एप्रिल पर्यंत नोंदणीचे आवाहन…
ओरोस ता.५: “ध्यास कलेचा” या संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी १४ एप्रिल पर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. कोरोना विषाणु विरोधी जनजागृती करणारे पोस्टर स्पर्धकांने काढणे बंधनकारक आहे.
यासाठी रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक असे बक्षिसांचे स्वरूप आहे. शालेय गट व महाविद्यालयीन-खुला गट या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. यासाठी रंगाचे बंधन नसुन ए-फोर साइज कागदावर पोस्टर काढणे अपेक्षित आहे. काढलेल्या चित्राखाली नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहिणे अपेक्षित आहे. स्पर्धकाने आपण काढलेल्या चित्राचा फोटो काढून तो दिलेल्या व्हाट्स अप नंबरवर १४ एप्रिल पर्यंत पाठवायचा आहे. यासाठी नितेश कुणकवळेकर-९९२२५८६६९२, साईं पारकर -७५०६९६६९८७, अक्षत सावंत ७८७५८७५७५४ यांच्याशी संपर्क साधुन अधिक माहिती घेण्याचे आवाहन आयोजक “ध्यास कलेचा” या संस्थेमार्फत करण्यात आले आहे.