उद्यापासून खाजगी रुग्णालयात सेवा सुरु; डॉक्टर फॅटर्निटी क्लबने मानले राणेंचे आभार…
कणकवली, ता.०४: आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना पीपीई कीट उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील खासगी रुग्णालये सुरू होतील. तसेच पीपीइ कीट तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे यांनी आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले आहेत.
डॉ.पाताडे यांनी म्हटले की, गेले काही दिवस पीपीई किट नसल्याने रुग्ण सेवा देण्यास मर्यादा येत होत्या. मात्र आता आमदार राणेंच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व 700 डॉक्टरांना पीपीई कीट उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागापासून शहरी भागातील खासगी वैद्यकीय सेवा आता सोमवारपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे.
पीपीई कीट मध्ये फेसमास्क, हॅण्ड कव्हर, बॉडी कव्हर, गॉगल ग्लास, शू कव्हर, ग्लोव्हज आदींचा समावेश आहे.