सावंतवाडी कुटीर रुग्णालय सहा परिचारिका नियुक्त…

2

राजू मसुरकर;लॅब व डायलिसीस विभागात प्रत्येकी एक कर्मचारी….

सावंतवाडी ता.०५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी कुटीर रूग्णालयात सहा परिचारिका नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आहेत.तसेच डायलिसिस सेंटर्समध्ये व टेस्टिंग लॅब मध्ये प्रत्येकी एक कर्मचारी देण्यात आलेला आहे.आजपासून हे सर्व कर्मचारी हजर झाले.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.गेली अनेक वर्षे ही पदे रिक्त होती.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पदे भरण्यात यावी,अशी मागणी आपण कोल्हापूर उपसंचालकांकडे केली होती.त्यानुसार ही पदे भरण्यात आलेली आहेत.त्यामुळे याचा फायदा येथील लोकांना होणार आहे,असा विश्वास श्री.मसुरकर यांनी व्यक्त केला.

5

4