अफवा पसरविल्या प्रकरणी राज्यात ७८ जणांवर गुन्हे दाखल…

2

सिंधुदुर्गातील दोघांचा समावेश; महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई…

सिंधुदुर्गनगरी ता.०५: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत फेक माहिती पसरविणे,पंतप्रधानांच्या नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती निवारण फडा बाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल तसेच जातीय द्वेष पसरविल्याबद्द्ल महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ७८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

सध्या राज्याची सायबर सेल फेसबुक, ट्विटर, टिकटोक, व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहे.कोरोना वायरस बाबत चुकीची माहिती पसरवण्यासाठी,बनावट व्हिडिओ, मेसेज आणि माहिती पोस्ट केल्याबद्दल ९ व्यक्तींवर सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.यात नाशिक, मुंबई (८),पुणे (७), सातारा (६), बीड (५), ठाणे, नागपूर, कोल्हापूर (प्रत्येकी ४), गोंदिया, भंडारा, जळगाव (प्रत्येकी ३) आणि सोलापूर, सिंधुदुर्ग २ व्यक्तिंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1

4