दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुरातील तिघे ताब्यात…

2

दोडामार्ग पोलिसांची कारवाई; कार सह ३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त…

दोडामार्ग ता.०५: लॉकडाऊन काळाचा फायदा घेवून बेकायदा दारू केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीसांनी कोल्हापूर येथील तिघांना ताब्यात घेतले व कारसह तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने कुंब्रल येथे दोडामार्ग चंदगड रस्त्यावर करण्यात आली.
सतीश भीमराव आरदाळकर,अतुल वसंत शिंदे, श्रीशैल अशोक बिराजदार तिघे रा.कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहे.या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.तर दारूसह गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.संबंधित संशयित डाऊनलाॅकचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळी वाहतूक करत होते.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.

4

4