Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedसिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारेंनी जपली सामाजिक बांधिलकी...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारेंनी जपली सामाजिक बांधिलकी…

स्वखर्चाने मतदारसंघात वयोवृद्ध,अपंग,गरजूंना अन्नधान्याचे वाटप…

देवगड ता.०६: तालुक्यातील किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने किंजवडे कट्टा येथील गरजू नागरिकांना,अपंग,वयोवृद्ध आदींना अन्नधान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रविवारी कट्टा किंजवडे आदी गावातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावांमध्ये जि.प सदस्या सौ. घारे यांच्या वतीने गरजू,अपंग,वयोवृद्ध आदींना स्वखर्चाने अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे.किंजवडे व कट्टा येथे अन्नधान्य वाटप करत रविवारी शुभारंभ करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. घारे,श्री महेश घारे कुटूंबियांचे स्थानिक ग्रामस्थांमधुन आभार व्यक्त होत आहेत.या दरम्यान जि.प सदस्या मनस्वी घारे यांनी कट्टा आरोग्य केंद्राला भेट
देत आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments