अत्यावश्यक सेवा देणार्‍यां यंत्रणेला काँग्रेसकडून मास्क वाटप…

2

सावंतवाडी.ता,०६:
सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना आज मास्क वाटप करण्यात आले.यावेळी आपल्या जिवावर उदार होवून सेवा देणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी तब्बल पाच हजाराहून अधिक मास्क वाटप करण्यात येणार आहे,असे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी सांगितले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी,जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, महेंद्र सागेलकर,सुधीर मल्हार,चद्रकांत राणे,बाब्या म्हापसेकर, कौस्तुभ गावडे,राघवेद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.यावेळी येथिल कुटीर रुग्णालय हॉस्पिटल,पोलिस स्टेशन,तहसिलदार कार्यालय आदी ठीकाणी या वस्तू वाटप करण्यात आल्या.आता टप्प्याटप्पाने अन्य ठीकाणी या वस्तू वाटप करण्यात येणार आहे. असे श्री गावडे यांनी सांगितले.

1

4