Wednesday, May 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedव्हॉट्स ॲप ग्रुपवर चुकीचे संदेश प्रसारीत कराल,तर सावधान...!

व्हॉट्स ॲप ग्रुपवर चुकीचे संदेश प्रसारीत कराल,तर सावधान…!

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा…

सिंधुदुर्गनगरी ता.०६: दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाच्या घटनेनंतर सोशल मिडीया, व्हॉट्सॲप ग्रुपवर विविध प्रकारचे सांप्रदायिक भावना भडकवणारे संदेश प्रसारित होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यतील कायदा व सुव्यवस्था राखणे व अशा प्रकारच्या संदेशास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने दिनांक ५ एप्रिल २०२० रोजीपासून जर व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणीही धर्म, धर्मगुरू, धार्मिक स्थळांबाबत संदेश किंवा समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा असा कोणताही संदेश प्रसारित केल्यास संबंधीत व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन हे गुन्ह्यास पात्र राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चेकलम 144 (1), (3) अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments