Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedवेंगुर्ला येथे गरीब व गरजू नागरिकांना मोफत मास्क वाटप...

वेंगुर्ला येथे गरीब व गरजू नागरिकांना मोफत मास्क वाटप…

सामाजिक कार्यकर्ते विलास गावडेंचा पुढाकार…

वेंगुर्ले ता.०६: तालुक्यातील रोजंदारीवर काम करणारे मजूर,पर जिल्ह्यातून या जिल्ह्यात कामासाठी आलेले कामगार तसेच तालुक्यातील गोरगरीब नागरीक यांचे आरोग्य ही तितकेच महत्वाचे असल्याने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने व आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष, जिल्हा बँक संचालक विलास गावडे यांनी अशा लोकांच्या आरोग्याबाबत पुढाकार घेतला असून त्यांनी स्वखर्चाने तालुक्यासह जिल्ह्यातील कामगारांना मोफत मास्क वाटप केले आहे.
कोरोनामुळे सध्या देशात लाँक डाऊन व संचारबंदी आहे तसेच राज्य, जिल्हानिहाय सीमा बंदी असल्यामुळे रोजंदारी मजूर, परप्रांतातील सिंधुदुर्गात असलेले कामगार यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन हा कार्यक्रम श्री. गावडे यांनी हाती घेतला आहे. या वेळी वेंगुर्ले नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक विधाता सावंत, वेंगुर्ला नगरपालिका गटनेते तथा काँग्रेस नगरसेवक प्रकाश डिचोलकर, अब्दुल शेख, राजा साटेलकर, बाबू साळगावकर आणि युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे कार्यकर्ते उपस्थित होते. युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे यांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी तालुक्यातील भूस्खलन ग्रस्त नागरिकांना अन्नधान्य पुरवठा, त्यामागच्या वर्षी तालुक्यातील शेतक~यांना बी बियाणे खरेदी साठी आर्थिक मदत आदी उपक्रम नैसर्गिक आपत्ती तसेच राष्ट्रीय आपत्ती वेळी सातत्याने राबविले जात असतात.त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments