प्राथमिक शिक्षक भारती देवगडच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

2

शिरगाव पाडागर मधील परराज्यातील कुटुंबाना दिला लाभ…

देवगड ता.०६:येथील  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती  शाखेच्या वतीने शिरगाव,पाडागर  येथील रस्ते कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
शिरगाव तालुका देवगड येथे कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असलेल्या कर्नाटक मधील 28 लोकांच्या 10 कुटुंबांना व शिरगाव तावडेवाडी येथील  श्रीमती चंद्रभागा तावडे यांच्या निराधार कुटुंबाला  तांदूळ,पीठ, कडधान्य, बटाटे, कांदे,तेल ,साखर व  अल्पोपहार पॅकेट  असे 7000₹ चे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.यावेळी लमाण वस्ती प्रमुख पवार यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील आवश्यक त्या ठिकाणी वेळोवेळी गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्प शिक्षक भारतीच्या पदाधिकारी यांनी केला  आहे.
यावेळी  प्राथमिक शिक्षक भारती देवगड संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव जाधव, तालुकाध्यक्ष विनायक कांबळे, सभासद ,शिरगाव गावाचे पोलीस पाटील चंद्रशेखर साटम,पं. स.देवगड चे माजी सभापती सदानंद देसाई, शिरगाव ग्रामस्थ निलेश शेट्ये,हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते.

3

4