वेंगुर्ले ता.०६: तालुक्यातील आसोली गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.
कोरोना व्हायरसचा धोका सर्व जगभर वेगाने पसरतो आहे. त्यावर मात करण्यासाठी बाहेरची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने घरातील सामने आवश्यक आहे.शासकीय यंत्रणा विविध प्रकारे उपाययोजना करीत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून चार एप्रिल रोजी आसोली ग्रामपंचायतीकडून हद्दीतील सक्राळवाडी,माईनतवाडी जाधववाडी, देऊळवाडी,घाडीवाडी, आरुकवाडी,न्हैचिआड,राजधुरीवाडी,कारकोंडवाडी,रांजणवाडी,कुकेरखिंड,जोसोली,वडखोल आदी भागातील सर्व रस्ते व सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
यावेळी सरपंच रिया कुडव,ग्रामपंचायत सदस्य संकेत धुरी,रसिका कुडव, पोलीस पाटील निलेश पोळजी,आरोग्य सेविका के.के.नाईक,आशा स्वयंसेविका साक्षी घाडी,ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर जाधव,शांताराम मुळीक,बाळकृष्ण सोलकर,मुकुंद नाईक आदी उपस्थित होते. यासाठी असोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसोली गावात जंतुनाशक फवारणी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES