Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआचरा रामेश्वर देवस्थानकडून लाखाची मदत...

आचरा रामेश्वर देवस्थानकडून लाखाची मदत…

तहसीलदार पाटणे यांच्याकडे धनादेश सुपूर्द…

आचरा, ता. ६ : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या प्रयत्नांना न्यासाकडून हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे समितीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्याकडून तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे सुधीर सुखटणकर, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर आदी उपस्थित होते. तहसीलदार पाटणे यांनी सांगितले की जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे. या कोरोनामुळे प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींना मदत करणे गरजेचे बनले आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे समितीने केलेली मदत कौतुकास्पद आहे. तसेच अशा दानशूर संस्था, व्यक्ती यांनी या मदत निधीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रावर आलेल्या आर्थिक संकटात सहकार्य करण्याच्या उद्देशाने हि मदत करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments