पाटीदार समाज आणि शंकर ट्रेडर्सच्या वतीने गरजूंसाठी धान्य…

2

मालवण, ता. ६ : शंकर ट्रेडर्स आणि उमिया हार्डवेअरचे मालक धनसुखभाई व मणीभाई यांच्या मातोश्री रतन बेन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि निराधार व्यक्तींच्या मोफत अन्नदानासाठी आस्था ग्रुपकडे धान्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी शांतीभाई पटेल, अमित पटेल, अशोक पटेल, जगदीश पटेल, आस्था ग्रुपचे उपाध्यक्ष सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, सचिव मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना आपत्ती काळात पाटीदार समाज बांधव गरजू बांधवांना मदत करण्यासाठी नेहमीच सहकार्याचा हात देतील, असे शांती पटेल यांनी सांगितले.

2

4