लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ओमगणेश कला-क्रीडा मंडळाचा पुढाकार…
दोडामार्ग/सुधाकर धर्णे ता.०७: ओमगणेश कला-क्रीडा मंडळ,साटेली व युथ हेल्पलाईन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने साटेली येथे निराधार महिलेला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १४ एप्रिल पर्यंत लॉक डाउन आहे. या कालावधीत हातावर पोट असणाऱ्या तसेच निराधार लोकांना अन्न पाण्याची समस्या जाणवत आहे. या साठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. साटेली परिसरातील अशा व्याक्तींना आधार देण्यासाठी गावातील ओम गणेश कला क्रिडा मंडळ व युथ हेल्पलाईन ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे.
यांच्या मार्फत ग्रा.प.साटेली भेडशी च्या कार्यालया जवळ वास्तव्यास असणाऱ्या निराधार महिलेस अध्यक्ष ऋषिकेश धर्णे, वैभव इनामदार यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी परमे सरपंच आनंद नाईक, बाबा मयेकर, कलय्या हिरेमठ आदी उपस्थित होते. ओम गणेश युवक मंडळ व युथ हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.