सोनूर्ली गावात १००० मास्क आणि सॅनिटाझरचे वाटप…

2

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार…

सावंतवाडी ता.०७:  करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोनूर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावातील नागरिकांना घरपोच मास्क आणि सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन हे वाटप केले.दरम्यान या उपक्रमाच्या माध्यमातून गावात एक हजार मास्कचे वाटप होणार आहे,असे सरपंच गुंजन हिराप यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच शंकर गावकर,लक्ष्मी पालयेकर,गौरी गावडे,अनीता गावकर,संतोष ओटवणेकर,दत्ताराम पार्सेकर,वैभवी गावकर,सायली गावकर,सखाराम गावकर,गोविंद हिराप,गुणाजी गावडे,स्वरस्वती धुरी,आत्माराम मुळीक आदी उपस्थित होते.

0

4