साटेली भेडशी बाजारपेठ वादावर अखेर पडदा…

2

प्रशासन ग्रामस्थांच्या बैठकीनंतर निर्णय; सकाळी आठ ते दोन दुकाने सुरू राहणार…

दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.०७:  साटेली भेडशी बाजारपेठे सुरू करण्याबाबत आज येथिल तहसिलदार कार्यालयात व्यापारी आणि कोरोना प्रतिबंध कृती समितीच्या सदस्यांची बैठक तहसिलदार मोरेश्वर हाडके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेवुन उपाययोजना करण्यात याव्यात, त्याचबरोबर बाजारपेठ सरसकट सुरु न करता काही ठराविक वेळेसाठी सुरु करावीत, दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, आदी विषयांवर चर्चा होवुन अखेर सर्वानुमते बाजारपेठ शनिवार सोडून बाकीचे दिवस सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेतच सुरु राहतील, असे ठरले. त्याच बरोबर सोशल डिस्टन्सिंग बाबत त्या-त्या दुकांनदाराने काळजी घेण्याचे ठरले.
सर्व दुकानांबाहेर दरपत्रक लावण्याचे आदेश यावेळी तहसिलदारांनी सर्व व्यापार्‍यांना दिले. ज्या किराणा दुकानांमध्ये जिवनावश्यक वस्तू शिवाय इतर वस्तू विकल्या जात असतील, तर अशा दुकांनवर कारवाई करण्यात येईल, असे देखिल त्यांनी सुचित केले.
यावेळी तहसीलदार मोरेश्वर हाडके, दोडामार्ग पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव,ग्रामसेवक गावडे,साटेली भेडशी सरपंच लखु खरवत, उपसरपंच सुर्यकांत धर्णे, सदस्य रामचंद्र भिसे, गणपत डांगी, प्रकाश कदम,पोलीस पाटील गोपाळ कदम त्याचबरोबर किराणा दुकानदार राजेश जुवेकर, सुनील महाराज, संतोष केसरकर, सुरज टोपले, राकेश महाराज, भरत परमेकर,उत्कर्ष जुवेकर आदी उपस्थित होते.

6

4