कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मास्कचे वाटप…

2

वेंगुर्लेत सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचा उपक्रम…

वेंगुर्ले ता.७:  तालुक्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका, डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी अशा सेवेकऱ्याना सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेने तर्फे सुमारे दोन हजार मास्क चे वाटप करण्यात आले.
शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हाचे खासदार श्री विनायक राऊत, पालकमंत्री श्री उदय सामंत तसेच सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे आमदार माजी राज्यमंत्री श्री दीपक भाई केसरकर, विधान सभा संपर्क प्रमुख श्री शैलेशजी परब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने सावंतवाडी विधान सभा मतदार संघ प्रमुख श्री विक्रांत सावंत यांनी हा मास्क पुरवठा केला आहे. सदरचे मास्क वेंगुर्ला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी याच्या मार्फत वाटप करताना उपजिल्हा प्रमुख श्री बाळा दळवी, तालुका प्रमुख श्री यशवंत उर्फ बाळू परब, शाखा प्रमुख श्री.नितिश कुडतरकर, आपा परब आदी उपस्थित होते.

1

4