Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी मायकल डिसोजा मित्रमंडळ धावले...

सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी मायकल डिसोजा मित्रमंडळ धावले…

लॉकडाऊन संपेपर्यंत घेतली जेवणाची जबाबदारी; आज पासून शुभारंभ…

सावतवाडी, ता.०७: कोलगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य मायकल डीसोझा आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून येथिल उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची जबाबदारी आज पासुन घेण्यात आली.यावेळी तब्बल शंभर लोकांना त्यांनी जेवण उपलब्ध करुन दिले.लॉकडाउनचा काळ संपेपर्यत संबधित लोकांची जबाबदारी आपण मित्रमंडळाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे,असे श्री.डीसोझा यांनी सांगितले.
या सेवेचा शुभारंभ सावंतवाडी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर श्री.उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा,पंचायत समिती सदस्य श्री.मेघशाम काजरेकर,सरपंच शिवदत्त घोगळे तसेच मायकल डिसोजा मित्र मंडळाचे संदीप माळकर, निशिकांत पडते ,शैलेश टीळवे, चेतन बामणे, बाळू बोभाटे, श्री भालेकर ,मनोहर ठिकार व इतर सदस्य उपस्थित होते
ते म्हणाले, लॉकडाउनचा कालावधी असल्यामुळे शहरातील सर्व दुकानेे, हॉटेल ,रिक्षा बंद आहेत,मात्र सदयस्थिती लक्षात घेता सावंतवाडी कुटीर रुग्यालयात येणार्‍या रुग्णांची व नातेवाईकांची संख्या मोठी आहे.त्यामुळे त्या लोकांची सोय सावंतवाडीतच व्हावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments