Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली १ लाख रुपयांची मदत...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली १ लाख रुपयांची मदत…

वेंगुर्ले-मठ येथील उद्योजक दीपक ठाकूर यांचा पुढाकार…

वेंगुर्ले, ता.०७: तालुक्यातील मठ येथील उद्योजक तथा युवा काजू कारखानदार दीपक ज्ञानदेव ठाकूर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी १ लाख रुपये दिले.
कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन श्री. ठाकूर यांनी हा निधीचा धनादेश दिला आहे. मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकूर यांच्या हस्ते हा धनादेश तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याकडे देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपतालुकप्रमुख संजय गावडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments