“मुठभर” धान्य देवून बांदेकरांनी उचलला “खारीचा वाटा”…

2

गोरगरीबांना मदतीसाठी; बांदा भाजपाचा अनोखा उपक्रम…

बांदा ता.०७: देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठे हाल होत आहे.या कुटुंबांना विविध संघटना,राजकीय पक्ष मदत करत आहेत.याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी बांदाच्या वतीने एक अभिनव उपक्रम आज राबविण्यात आला.येथील रास्त धान्य दुकानाजवळ मला मिळालेल्या धान्यातील एक मूठ धान्य गरिबांसाठी असा हा उपक्रम होता.
या धान्य दुकानावर आलेल्या नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य याठिकाणी ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये दान म्हणून देत या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सावंतवाडी तालुुका अध्य्यक्ष बाळा आकेरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमावेळी उपतालुका अध्यक्ष बाळू सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बाबा काणेकर, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, आबा धारगळकर, केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, प्रवीण नाटेकर, बाबल नार्वेकर, मंगल मयेकर, अरुणा सावंत, बबिता नार्वेकर आदी उपस्थित होते. या सर्वांच्या सहभागातून एक अनोखी संकल्पना आज बांदा शहर भाजपच्या वतीने धान्य सोसायटीच्या ठिकाणी राबवण्यात आली.
याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणात धान्य गोळा झाले. हे धान्य गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याचे बाळा आकेरकर यांनी सांगितले.

2

4