रेल्वेचे आरक्षण पुन्हा बंद…..

2

 

रेल्वे मंत्रालयाचा निर्णय; ३० एप्रिल पर्यत धावणार नाहीत गाड्या….

कणकवली,ता.०७:  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रेल्वे मंत्रालयाकडुन १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेले बुकींग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडुन हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता कीमान ३० तारखेपर्यत तरी खाजगी गाड्या धावणार नाहीत. त्यात तेजस एक्सप्रेस दिल्ली ते लखनऊ ,अहमदाबाद ते दिल्ली आदि खासगी गाड्यांचा समावेश आहे.दरम्यान या काळात ज्या प्रवाशांनी बुकींग केले त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत,असे रेल्वेच्या अधिकार्‍यांकडुन सांगण्यात आले.

10

4