Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक...

सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक…

ओरोस जिल्हा परिषद वसाहतीमधील प्रकार; संबंधित महिलेची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार…

सिंधुदुर्गनगरी,ता.०७: कोरोनाच्या प्रार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रत्येक घरात जावून आरोग्य कर्मचाऱ्यां मार्फत सर्वहेक्षण केले जात आहे. मात्र जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या या सव्हेक्षणात काही व्यक्तीचा अडसर निर्माण होत आहे. यात एक प्रकार ओरोस येथील आशा स्वयंसेविके बाबत घडला आहे. जिल्हा परिषद् वसाहतीमधील एका शासकीय कर्मचाऱ्या कडून आशा कर्मचारी ला अपमानसपद् वागणूक मिळाली आहे. याबाबत संबधित आशा सवयंसेविकेने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहे.

कोरोना विषाणुचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक घरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती, तसेच त्यांच्या प्रवासाची माहिती घेतली जात आहे. यात कोणाला खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आहे का, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती याची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका प्रशासनातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाला जिल्हावसीय जनतेकडून चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र काही व्यक्तिकडून ही माहिती देताना अडसर निर्माण केला जात आहे. असाच एक प्रकार सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद वसाहतिमध्ये घडला आहे. जिप वसाहती मध्ये सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या आशा कर्मचाऱ्या ला जिप मधील आर्थिक बाबीशी निगडित असलेल्या विभागाच्या एका शिपाया कडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. जनतेच्या आरोग्या साठी काम करत असताना अशी वागणूक मिळाली असल्याने या आशा स्वयंसेविकेने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments