बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी साता-यातील दोघे ताब्यात…

2

बांदा पोलिसांची कारवाई; ३ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.०७: मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी येथे सिमा तपासणी नाक्यावर गोव्यातून सिंधुदुर्गच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहतूक करताना बांदा पोलिसांनी कारवाई केली. बोलेरो पीकअप सह ३ लाख ३९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक सुमित हनुमंत भोसले (वय २७ रा. शिवाजीनगर, खंडाळा, जि.सातारा) तसेच त्याचा सहकारी अजिंक्य पोपट भोसले (वय २२ रा. खंडाळा-सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली.

3

4