अवैध दारू वाहतुकीच्या चोरट्या वाटाच बंद…

2

 

चोरट्या दारू वाहतुकीस चाप ; दोडामार्ग पोलिसांची कार्यवाही…

दोडामार्ग, सुधाकर धर्णे- ०७ : गोवा राज्यातून चोर वाटेने मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारु ही दोडामार्ग मार्गे महाराष्ट्रात वाहतुक केली जात असल्याने दोडामार्ग पोलिसांनी एक नामी शक्कल लढवत गोवा राज्यातून दोडामार्गात येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व चोर वाटा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बंद केल्या. त्यामुळे चोरट्या दारु वाहतुकीस चांगलाच चाप बसला आहे.
दोडामार्ग तालुक्यात काही ठराविक ठिकाणीच पोलिस चौक्या ह्या संचारबंदीच्या काळात सुरु आहेत. त्यातच गोवा राज्यातून दोडामार्ग मार्गे महाराष्ट्र राज्यात येण्यास अनेक चोर वाटा अस्तित्वात आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या काळात या चोर वाटांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात दारु वाहतुक केली जात आहे. कुंब्रल येथे दारु वाहतूक करणारी गाडी पकडल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर अखेर आज दोडामार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बागल व सहकाऱ्यांनी यावर नामी शक्कल लढवीत या चोर वाटाच जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बंद केल्या.
संचारबंदीच्या काळात दोडामार्ग येथे पोलिस चौकी असल्याने चौकी एक आणि वाटा अनेक या उक्ती प्रमाणे चोरटी दारू वाहतूक करणारी मंडळी पेडणे व डिचोली या दोन तालुक्यातून पोलिसांना चकवा देत दोडामार्गात येत होती. मात्र पोलिसांनी या चोर वाटाच आता बंद केल्याने अवैध चोरट्या दारू वाहतुकीस चांगलाच चाप बसला आहे.

8

4