खांबाळे ग्रामपंचायतीने गावात केली स्वयंसेवकांची नेमणूक…

2

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी सुविधा…

वैभववाडी.ता,०८:  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यासाठी खांबाळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घरपोच मिळावा यासाठी गावात स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मास्क प्रत्येक व्यक्तीला व सॅनिटायझर प्रत्येक कुटुंबाला वाडीनिहाय देण्यासाठी खांबाळे ग्रामपंचायत सरपंच सारिका सुतार , शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच लहू साळुंखे, ग्रामसेवक जी. डी. कोकणी, आदींच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाच्या आरोग्य आरोग्य सेविका श्रीम. एस. ए. बोडेकर यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. तसेच गावातील सर्व रस्ते, शाळा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इत्यादी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजीटल फलक व माईकद्वारे जनजागृती करण्यात आली.

2

4