वैभववाडीत पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला चहा-नाष्टा…

2

जयेंद्र इंण्डेन व प्रीती हॉटेल यांच्या मार्फत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उपक्रम…

वैभववाडी ता.०८: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना वैभववाडी येथील जयेंद्र इंण्डेन व प्रीती हॉटेल यांच्या वतीने बुधवारी सकाळी चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. जयेंद्र इंण्डेनचे मालक जयेंद्र रावराणे व प्रीती हॉटेलचे मालक श्री. मुरकर, त्याचबरोबर वैभववाडीचे उपनगराध्यक्ष रोहन रावराणे यांनी सकाळी पोलीस ठाणे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, त्याचबरोबर संभाजी चौकात ड्युटी बजावणारे पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना अल्पोपहार दिला.
कोरोनाच्या संकट काळात नेहमी शहर स्वच्छ ठेवणा-या नगरपंचायतीच्या स्वच्छता दुतांना ही चहा, नाष्टा व पाणी सुविधा यांच्यामार्फत देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत श्री रावराणे व मुरकर यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल प्रशासनाने आभार मानले. संकट काळात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना यापुढेही मदत करत राहू. असे उपनगराध्यक्ष रोहन रावराणे यांनी सांगितले.

0

4