कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेतला परिस्थितीचा आढावा….
दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.०८: तालुक्यातील साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला आज तहसिलदार मोरेश्वर हाडके आणि गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी भेट दिली.दरम्यान यावेळी कोरोना विषाणूच्या प्रार्श्वभूमीवर एकुण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.तर याठिकाणी मजुर कामागार आणि विविध वाहनांवर चालक म्हणुन काम करणाऱ्यांना निवारा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने साटेली येथिल केंद्रशाळेच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी साटेली भेडशी सरपंच लखु खरवत,ग्रामविकास अधिकारी एस.बी.गावडे,उपसरपंच सुर्यकांत धर्णे,तलाठी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत,तलाठी सचिन गोरे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कदम आदि उपस्थित होते.
त्यानंतर बाजारपेठेत त्यांनी किराणा दुकानांनाही भेट देत सोशल डीस्टन्सिंग बाबत त्याचबरोबर दुकानांबाहेर दरपत्रक लावण्याबाबत सुचना केल्या.