शिवसेनेकडून माजगावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

2

विक्रांत सावंत यांचा पुढाकार; ५०० कुटूंबियांना दिला लाभ…

सावंतवाडी.ता,०८: येथील तालुका शिवसेनेच्या वतीने माजगाव येथील सुमारे ५०० ग्रामस्थांना जीवनाश्यक वस्तू व सेवा वाटप करण्यात आल्या.यावेळी शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत तसेच सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार माजी राज्यमंत्री दीपक भाई केसरकर विधानसभा संपर्कप्रमुख शैलेशजी परब प्रेरणा व मार्गदर्शनाने सावंतवाडी विधान सभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी हा धान्य पुरवठा केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यासाठी माजगावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले आहे.यावेळी
जिल्हाप्रमुख श्री संजय पडते,उपजिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी,सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष श्री विकांत सावंत ,तालुका प्रमुख रुपेश राऊळ ,माजी पंचायत समिती उपसभापती विनायक दळवी,सरपंच दिनेश सावंत,उपसरपंच संजय कानसे,माजगाव विभागप्रमुख संजय माजगावकर ,माजगाव शाखाप्रमुख श्री रुपेश नाटेकर,माजी सरपंच श्री आबा सावंत,शाखाप्रमुख श्री महेश पेडणेकर, ग्राम सदस्य श्री शिवराज परब,शाखाप्रमुख श्री नरहर शिरोडकर,श्री योगेश सावंत आदी उपस्थित होते.

4

4