संजू परबांनी फुकाचे श्रेय घेवू नये…

2

 

जयेद्र परुळेकरःचार महीन्यात निधी आणला हे सांगणे हास्यास्पद

सावंतवाडी ता
आपल्या शंभर दिवसाच्या नगराध्यक्षपदाच्या काळात शहराचा विकास केला करोडो रुपयाचा निधी आणला असे भासविण्याचा प्रयत्न करणार्‍या नगराध्यक्ष संजू परबांनी फुकाचे श्रेय घेवू नये.असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेद्र परुळेकर यांनी आज येथे मारला आहे.
दरम्यान शहराचा विकास करण्यासाठी गेली अनेक वर्षे माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी निधी आणला हे सर्वानाच माहीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निधी आपण आणला असे सांगणार्‍या परबांचा दावा हास्यास्पद आहे असे त्यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष  परब यांच्या नगराध्यपदाच्या कालावधीला शंभर दिवसाचा कार्यकाल पुर्ण झाला आहे.

या पार्श्वभूमिवर त्यांच्याकडुन काही कोट्यावधी रुपयाचा निधी आणला तसेच विकासकामे केली असा दावा करण्यात आला होता याला श्री परुळेकर यांनी टिकावजा प्रत्युत्तर दिले आहे
ते पुढे म्हणाले साथरोग काळात संपूर्ण देशासह आपले राज्य व जिल्हा लाॅक डाऊन मध्ये असताना सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी कृपया खोटं बोलून आपला हसा करून घेऊ नये.
आपल्याला पदावर येऊन शंभर दिवस झाले आणि गेल्या शंभर दिवसात आपण कशी विविध कामे मार्गी लावत आहोत असे दाखविण्याच्या प्रयत्नात त्यांनी धादांत खोटी आणि सावंतवाडीतील नागरिकांची दिशाभूल करणारी वक्तव्यं केलेली आहेत, हे हास्यास्पद आहे.सावंतवाडी मधील जनता सुज्ञ आणि सुजाण आहे.
बॅ नाथ पै सभागृह नुतनीकरणासाठी माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने ते पालकमंत्री असताना सदर निधी मंजूर झालेला होता आणि आता त्यामुळेच सभागृहाचे नुतनीकरण शक्य होत आहे.तसेच सावंतवाडी शहरातील नळपाणी योजनेसाठी ४६ कोटी रुपयांचा निधी हा नगरोत्थान अंतर्गत केसरकर यांच्या प्रयत्नांनेच मंजूर झालेला होता.तो आता उपलब्ध होत आहे.
अशा उपक्रमांसाठी असणारा कोट्यवधी रुपयांचा निधी दोन चार महिन्यात मंजूर होत नसतो हे वास्तव सावंतवाडी शहरातील जनतेला माहित आहे. त्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करावे लागतात.
त्यामुळे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न परब यांनी करू नये.

2

4