माणसांची वाहतूक कराल, तर गुन्हे दाखल करू….

2

दिक्षीतकुमार गेडाम;आंबा,भाजी वाहतूक करणार्‍यांना पोलिसांचा इशारा…

सिंधुदूर्गनगरी,ता.०९: जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या परवागनीचा गैरवापर करुन काही वाहनचालकांकडुन नातेवाईकांना जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांच्या विरोधात सिधुदूर्ग पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, कोणी तशा प्रकारे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्याकडुन देण्यात आला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, आंबा बागायतदार तसेच फळव्यापारी,भाजी व कृषीजन्य व पशुजन्य उत्पादनाची वाहतूक करणार्‍या व्यक्तींना देण्यात आलेल्या कायदेशीर सवलतीचा गैरफायदा घेवून सामाजिक आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना गेडाम यांनी केल्या आहेत.

1

4