जीवनावश्यक वस्तूत शासनाने दुधाचा समावेश करावा…

2

निशांत तोरसकर; मित्रमंडळाकडुन घेतली २५ कुटुंबियांची जबाबदारी…

सावंतवाडी,ता.०९:   लॉकडाउनच्या काळात लहान मुलांना आणि जेष्ठ नागरीकांना दुध उपलब्ध व्हावे, यासाठी येथिल निशांत तोरसकर आणि महेश पाटील मित्रमंडळाने पुढाकार घेतला आहे. तसेच शहरातील तब्बल २५ हून अधिक कुंटूबाना ते दुध घरपोच करणार आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवेत दुधासारखी गोष्ट येत असल्यामुळे प्रशासनाने लहान मुलांची आणि जेष्ठ लोकांची गरज लक्षात घेता दुध उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी श्री. तोरसकर यांनी केली आहे.
याबाबतची माहीती श्री तोरसकर यांनी दिली. ते म्हणालेे, या ठीकाणी लहान मुलांना दुध मिळण्यास अनेक अडचणी असल्याबाबत सर्वसामान्य लोकांकडुन सांगण्यात आले होते, त्यामुळे आम्ही आमच्या मित्रमंडळाकडुन यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पुढचे कीमान एक महीना आम्ही दुध वाटप करणार आहोत. यासाठी प्रशासनाने सुध्दा आम्हाला सहकार्य करणे, अपेक्षीत आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील लोकांना ही सेवा मिळावी, यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सरपंचानी ही सेवा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

0

4