कुंब्रल सरपंचाकडून सॅनिटायझर वाटप…

2

दोडामार्ग,ता.०९:  कुंब्रल गावचे सरपंच प्रविण परब यांच्या माध्यमातून संपुर्ण गावात आज मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता प्रशासनाकडुन मास्क आणी सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन करण्यात आले होते.
मात्र मेडीकल मध्ये असलेला तुटवडा लक्षात घेवून, श्री.परब यांनी पुढाकार घेत, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ५२३ कुटूंबाना हे वाटप केले. दरम्यान मदतीसाठी पुढाकार घेणार्‍या परब यांचे ग्रामस्थांकडुन कौतुक करण्यात आले.

14

4