वेंगुर्ले पं.स. सदस्य साक्षी कुबल यांची मुख्यमंत्री फंडासाठी मदत…

2

तीन महिन्याचे मानधन; गटविकास अधिकार्‍यांकडे दिले पत्र…

वेंगुर्ले,ता.०९:
वेंगुर्ले पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी योगेश कुबल यांनी आपले तीन महीन्याचे मानधन मुख्यमंत्री फंडात जमा करण्यासाठी पत्र गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्याकडे सादर केले.
कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या संकटामधून सावरण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या लढाईत सर्वांनी आपल्या जमेल तसे सहकार्य करा असे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत सौ. कुबल यांनी उपरोक्त निर्णय घेऊन आपले तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री फंडात जमा केले आहे.

2

4