कोळंबमधील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला…

2

मालवण, ता. ९ : कोळंब येथून काल बेपत्ता झालेल्या विठ्ठल डिचोलकर वय-३५ या तरूणाचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आज सकाळी आढळला. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

कोळंब येथील विठ्ठल डिचोलकर हे काल पहाटे चार वाजता घरात कोणालाही न सांगता निघून गेले. ते नेहमी सकाळी वॉकसाठी जात असत. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. गावातील लोकांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी त्यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत तरंगत असल्याचे स्थानिकांना दिसून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. याबाबत मालवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर हे तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

4

4