आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप…

120
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०९: येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या तांदूळ,डाळ आदी कडधान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे धान्य सोशल डिस्टन्सचे नियम पाळून घेतले.
यावेळी शाळेच्या वतीने पालकांना मास्कचेही वाटप करण्यात आले.दरम्यान याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत,कर्मचारी श्री.परब श्रीमती.जाधव उपस्थित होते.
सध्या देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या महा संकटाबाबत विद्यार्थी व पालकांनी कोणती काळजी घ्यावी व शासनाचे नियम व अटींचे पालन करावे,याबाबत जनजागृती करण्यात आली.सध्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्याचे वाटप पालकांना शाळेत बोलून देण्यात आले.तर ग्रामीण भागातील पालकांना शाळेच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.

\