हजारो कलमे खाक;बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावरील घटना..
बांदा,ता.०९: बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुतर्फा डेगवे, पडवे-माजगाव व डिंगणे गावांच्या सीमेवर आज दुपारी अग्निप्रलय झाला. भीषण आगीत शेकडो एकर क्षेत्रातील हजारो काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलीत. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. ऐन काजू हंगामात लागलेल्या या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी असलेल्या वीज जनित्र (ट्रान्सफॉर्मर) कडील आग स्थानिकांनी प्रसंगावधान राखत वेळीच विझविल्याने मोठा अनर्थ टळला. आज दुपारी दीड वाजता आग लागली.
आग विझविण्यासाठी माजी उपसरपंच मधु देसाई, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, पोलीस पाटील प्रमोद देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम देसाई, सुभाष देसाई, सीताराम देसाई, बाळकृष्ण देसाई, सुजित देसाई, सौरभ देसाई, उदय देसाई, विद्याधर देसाई, नारायण देसाई, महादेव परब, नकुळ देसाई, तुकाराम देसाई, हेमंत देसाई, नारायण देसाई, मंगलदास देसाई, दामोदर देसाई, निलेश देसाई यांनी मदतकार्य केले.