शाळा बंद नो टेन्शन; जी-क्लास अ‍ॅपच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास…

521
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार नीतेश राणेंचा पुढाकार; विद्यार्थी-शिक्षकांनी जी-क्लास डाऊन लोड करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

कणकवली, ता.०९:  लॉकडाऊनमुळे विद्यार्थी घरी असून शाळा, शिक्षक व विद्यार्थी हा समन्वयक काहीसा दुरावलेला आहे. सद्यस्थितीत घरी बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे अडचणीचे ठरत आहे. हाच धागा ओळखून आमदार नितेश राणे यांनी गुरुजीवर्ल्ड कंपनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते दहावीतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी जी क्लास ई लर्निंग अ‍ॅप आणले होते. त्याचा लाभ सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
कणकवली विधानासभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांसाठी ॠ-उश्ररीी अ‍ॅप डाउनलोड सुविधा मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. हे वचन त्यांनी पूर्ण केले असून शिक्षण व आरोग्य समिती सभापती सावी लोके व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी हे अँप डाऊनलोड करा अश्या सूचना गटशिक्षणाधिकारी सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत .
कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व खाजगी शाळा यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतूदीनुसार सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
या कालावधीत विद्यार्थी घरी असून शाळा, शिक्षक व विद्यार्थी हा समन्वयक काहीसा दुरावलेला असून सद्यस्थितीला घरी बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणे अडचणीचे ठरत आहे. हाच धागा ओळखून आमदार नितेश राणे देवगड विधासभा मतदार संघ व गुरुजीवर्ल्ड कंपनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते दहावी च्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभ्यासपूर्ण जीक्लास ई-लर्निंग अँप 30 जून 2020 पर्यंत विनामूल्य डाऊनलोड करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी त्याचा लाभ घेण्याविषयी आवाहन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना आवाहन करतो की, सदरचे अँप मोबाईल मध्ये हे अँप आजच डाउनलोड करून घ्या. घराच्या सुरक्षित वातावरणामध्ये आनंदात अभ्यास करा व अनावश्यकपणे घराबाहेर जाऊ नका.
तुमच्या मोबाईल मध्ये जीक्लास इ-लर्निंग अँप डाउनलोड करा आणि त्याच्या इयत्तेनुसार व्हिडीओ पाहून शिकणं सुरू ठेवा. नक्कीच त्यामुळे मुलांचं आकलन आपोआप सुरू राहील व सदर अँप द्वारे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना सराव देवून त्यांचा अभ्यास कितपत झाला आहे हे आजमावता येईल. या अँपमध्ये केलेल्या कृती सेव होत असून सदरचे अँप ऑफ लाईन पध्दतीने चालू करु शकतो. तरी याबाबत आपले अधिनस्त सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांना सदरच्या अँप डाऊनलोड करुन घेणेबाबत सुचित करावे. डढणऊध ऋजठच् कजचए ची एक नाविन्यपूर्ण संधी असून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे

\