चक्क नोटांची माळ घालून सांवतवाडीत घंटागाडी कर्मचार्‍याचे स्वागत

849
2
Google search engine
Google search engine
Google search engine

स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थापःसबनिसवाडा येथिल नागरीकांना अनोखा उपक्रम…

सावंतवाडी/अमोल टेंंबकर,ता.०९: एरव्ही घरोघरी जावून कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथिल पालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍याचे सुुनिल पाटील यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथिल सबनिसवाडा भागातील नागरीकांनी आभार मानले.तसेच यापुढे सुध्दा अशाच पध्दतीने सेवा बजवावी,अशी मागणी त्यांनी या कर्मचार्‍याकडे केली. लोकांचे प्रेम पाहून त्या घंटागाडी कर्मचार्‍याला सुध्दा एक सुखद धक्का बसला.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर शासनाकडुन घरात रहा, असे आवाहन करण्यात आहे. मात्र, सावंतवाडी पालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत,अशा कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथिल सबनिसवाडा भागात राहणार्‍या नागरीकांनी एक अनोखी शक्कल लढविली.घरोघरी पैसे जमा करून हे पैेसे जमा करण्यात आले. त्याठीकाणी कचरा गोळा करणार्‍या कर्मचार्‍याला आवश्यक असलेले नवे कपडे मास्क आदी साहीत्य तर दिलेच एवढ्यावरच न थांबता त्याला चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी करण्यात आली.यावेळी नागरीकांचे अशा प्रकारच्या अनोखे प्रेम पाहून त्या कर्मचार्‍याला सुखद धक्का बसला यावेळी प्रमोद वाडकर,अभय माईणकर,अतुल माईणकर,वासुदेव शितोळे,पुष्पक माठेकर,प्रणाली वाडकर,प्रतिज्ञा वाडकर,पौणिमा माठेकर,अर्पणा शितोळे,विशाल शितोळे आदी उपस्थित होते.

 

\