दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुर येथिल दोघे अटक….

781
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सीमा तपासणी नाक्यावर कारवाई; गाडीसह पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.०९:  बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी येथिल पत्रादेवी नाक्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आयशर टेम्पोसह व दारुसह तब्बल पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. सागर सुभाष पाटील वय २५,सुरेद्र शंकरलाल तुलसानी वय ३२, दोघे रा.कोल्हापुर अशी त्यांची नावे आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक अण्णासो बाबर,हवालदार सुमित चव्हाण,धनंजय गोले आणि श्री.कमतनुरे यांनी केली. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून गाडी जप्त करण्यात आली आहे.

\