व्यावसायिकांची दोडामार्ग तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी…
दोडामार्ग ता.०९: लॉकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यावसाय अडचणीत आला आहे.पुर्णपणे व्यावसाय ठप्प झाल्याने उपसामारीची वेळ आली आहे.त्यामुळे शासनाने आथिर्क सहकार्य करावे,अशी मागणी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रमेश साळकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोरोना चे संकट हे वेगवेगळ्या स्वरूपात अनेक लोकांना जाणवत आहे, फक्त कोरोना बाधितच याला अपवाद नसून या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने “लोकडाऊन” जाहीर केल्यानं लहान मोठे व्यावसायिकाना आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर राज्यातील विविध सार्वजनिक, वैयक्तिक व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करून आपला व आपल्या कुटुंबाचा चरित्रार्थ चालवणाऱ्या लोकांवर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून ऐन हंगामात त्यांना आर्थिक प्राप्तीसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.
यात अनेकांनी आपले व्यवसाय हे बॅंकांची तसेच खाजगी कर्जे काढून सूरु केली असल्याने ऐन हंगाम फुकट गेल्याने येत्या वर्षात ही कर्जे कशी फेडावीत या विवंचनेत हे व्यावसायिक आहेत. तसेच ते व्यवसाय करत असलेले दुकान गाळे हे भाडे तत्वावर असल्याने त्याची भाडी कशी फेडावीत, त्याचबरोबर लाईट बिल, इंटरनेट सेवा याचे बिल कोणत्या मार्गाने भरावे असा यक्ष प्रश्न या व्यावसायिकांसमोर आहे.
त्यामुळे दुकान गाळे भाडे, लाईट व इंटरनेट सेंवा बिल शासनाकडून माफ करण्यात यावे तसेच शासनाने व्यावसायिकांना विशेष अनुदान देऊन मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सचिव गोपाळ माजिक,सोमनाथ नाईक,शिरिष नाईक उपस्थित होते.