जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; अन्यथा कडक कारवाईचे आदेश…
सिंधुदुर्गनगरी ता.०९: कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाताना नाक-तोंड झाकण्यासाठी तीन पदरी मास्क,साधा कपडी मास्क,रुमाल किंवा कापड वावरणे बंधनकारक करण्यात आले आहे.याविषयी आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.
वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकानात मिळणारे किंवा घरगुती त्यार करण्यात आलेल्या कापडाचे,रुमालाचे धुण्यायोग्य असावेत, त्याचा पुनर्वापर करताना स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करुन वापरावेत. वापरलेले मास्क इतरत्र टाकू नयेत,ते जाळून नष्ट करावेत. नागरिकांनी, शासकीय, निमसाशकीय, खाजगी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या वाहनातून, कार्यलय परिसरात प्रवास करताना, काम करताना, बैठकीच्या वेळी किंवा कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क वापरणे बंधनकारक आहे.
कोणासही सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, धाप लागणे, थकवा येणे इ. कोरोना सदृष्य लक्षणे असल्यास त्यांनी सक्तीने वैद्यकीय तपासणी करून घएणे व शासकीय रुग्णालयाच्या सल्ल्याने कोरोना तपासणी करुन घेणे, तसेच लक्षणे दिसू लागल्यास त्याची माहिती आरोग्य यंत्रणेस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लक्षणे लपवल्यास व त्याची माहिती शासकीय यंत्रणास न दिल्यास संबंधितांवर साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कार्यवाही करण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणतेही कामकाज करत असताना कोरोना संसर्ग प्रतिबंधाविषयी उपाययोजना करणे व काळजी घ्यावी व सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आदेशही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्रचालकांनी डीजीपे च्या माध्यमातून पैसे काढणे, भरणा करणे, पैसे पाठविणे, तसेच खात्यातील रक्कम तपासणी या सुविधा नागरिकांनी द्यावयाच्या आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्रहकांना कमाल 10 हजार रुपये इतकी रक्कम फक्त आधार क्रमांकाद्वारे जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमन मार्फत काढता येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे कारण नाही. सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात ही सुविधा उपलब्ध असणार आहे.