श्वेता कोरगावकर यांच्याकडून मास्क साबणाचे वाटप…

120
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा.ता,१०: 
देशव्यापी लॉकडाऊनमुळे बांदा टोलनाका येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आलेल्या २५ जणांना जिल्हा परिषद सदस्य सौ. श्वेता कोरगावकर यांनी मास्क, डेटॉल साबण वाटप केले.
निवारा केंद्रातील सर्वजण हे परप्रांतीय आहेत. लॉकडाऊन करण्यात आल्याने हे सर्वजण बांदा, सावंतवाडी येथे अडकले होते. प्रशासनाने त्यांना बांदा सीमा तपासणी नाक्याच्या निवारा केंद्रात ठेवले आहे. विविध स्थानिक संस्था, मंडळे, धार्मिक प्रतिष्ठान यांच्यामार्फत त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. सौ. कोरगावकर यांनी मास्क व साबण चे वाटप केले. यावेळी आरोग्य सेवक राजन गवस उपस्थित होते.

\